image source
रविवारी नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर आयोजन
by kanya news||
सोलापूर : सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने २३ वर्षाआतील मुले व मुलींसाठी जिल्हास्तरीय (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धा रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी शासकीय मैदान, नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा जन्म ( दि. १ ऑक्टोबर २००१ ते ११ नोव्हेंबर २००४) दरम्यान जन्म झालेले असावे. यासाठी जन्म दाखला, दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत यांनी वितरीत केलेले जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
प्रवेशिका स्पर्धेवेळी स्पर्धेच्या स्पर्धा ठिकाणी सकाळी ८.३० वाजल्यापासून स्विकारले जातील. या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड केली जाईल. असे सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने कळविण्यात आले आहे, स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा. राजू प्याटी (९३२६०५५९४०) यांच्याशी संपर्क साधावा.