डॉ.अब्दुल कलाम पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाऊंडेशनतर्फे “होय भारत महासत्ता होणारचं..!” व्याख्यान
सोलापुरात भाकरी फॅक्टरीचा उद्घाटन सोहळा; डॉ.कलाम राष्ट्र उभारणी पुरस्काराचे आयोजन
By Kanya News||
सोलापूर : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाऊंडेशन, डॉ.कलाम कौशल्य विकास केंद्र, बसवसंगम शेतकरी गट व स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन, जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.२७ जुलै २०२४ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत ‘संस्कार क्रांती ज्ञानसत्र’ अंतर्गत होय भारत महासत्ता होणारचं..!” या विषयावर जाहीर व्याख्यान ” होणार आहे, अशी माहिती संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.कलाम सोबत डिआरडीओ काम केलेले सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ.अशोक नगरकर (पुणे) यांचे युवकांना प्रेरणादायी व्याख्यान व सोलापूर कृषी पर्यटन संधी यावर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि डॉ.कलाम राष्ट्रउभारणी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोलापुरातील सुप्रसिध्द ज्वारीपासून ड्रीम भाकरीची फॅक्टरी या उद्योगाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दररोज १ लाख हातावरील व चुलीवरच्या ज्वारी व बाजरीची भाकरी तयार करण्याचा संकल्प आणि ५०० महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने नवीन रोजगार उद्योगाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनी य कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्यस्तरीय डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार ज्ञानसिंहासन काशीपीठ जगदगुरु श्री श्री श्री १००८ जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
डॉ.कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रकाश महानवर, व्याख्यान केसरी वे.मु.श्री.बसवराजशास्त्री हिरेमठ, साताराच्या कांचन कुचेकर, जलतरणपटू किर्ती वपोीो्ग, सुभाष माने (पंढरपूर), गौडगांव येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांना देण्यात येणार आहे .पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, डॉ.कलाम यांचा ग्रंथ देवून गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, आत्मा प्रकल्प संचालक शितल चव्हाण, पर्यटन उपसंचालक शामा पवार , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . हा कार्यक्षम तद्देवाडी मठाचे श्री महांतेश महास्वामीजी, बसवारुढ मठाचे श्री शिवपुत्र महास्वामीजी यांचा दिव्य सान्निध्य लाभणार आहे . या कार्यक्रमात दुपारी १ ते २ या वेळेत व्याख्यान, २-३ या वेळेत सोलापुरा तील कृषी पर्यटन संधी यावर मान्यवरांचे मार्गदर्शन, दुपारी 3 ते ५ या वेळेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा विशेष गौरव मान्यवराच्या हस्ते होणार आहे.
यावेळी साताऱ्यांच्या योगशिक्षिका प्रिया चव्हाण , शिर्डी येथील नरेश राऊत फाउंडेशन, भरतनाट्य प्रशिक्षक श्रीनिवास काटवे, पत्रकार समाधान वाघमोडे, शंकरलिंग महिला मंडळ, कवी देवेंद औटी, रजिया जमादार, युवा उद्योजक राहुल काटकर , मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने, करमाळा येथील पांडुरंग वासकर,कोरवीलीचे राजशेखर पाटील, अनगरचे पाडुरंग शिंदे, अक्कलकोटचे अभिजीत लोके, कवी मारुती कटकधोंड, अमित कामतकर, दशरथ गोप, करकम येथील रविकिरण वेळापुरकर यांचा विशेष गौरव समारंभ होणार आहे. तसेच सोलापुरातील सूत्रसंचालन व विविध कार्यक्रम संयोजनात योगदान देणारे मंगेश लामकाने, लक्ष्मीकांत वेदपाठक, ऐश्वर्या हिबारे, पल्लवी पवार यांचा सन्मान होणार आहे.सोलापुतील विविध ग्रंथालय व एनएसएस विभाग यांना डॉ.कलाम कौशल्य विकास केंद्रातर्फे मोफत ग्रंथ वाटप करण्यात येणार आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ड्रीम फाउंडेशन विविध उपक्रम मागील २२ वर्षापासून अखंडपणे राबवित आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, दि.२७ जुलै २०२४ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वयम शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष-सोमेश्वर वैद्य, बसवसंगम शेतकरी गटाचे अध्यक्ष कल्लप्पा भतगुणकी, बसम्मा पंडीत-पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या कार्यक्रमास नागरीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक संगिता पाटील- भतगुणकी यांनी केले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित सर्वांना अस्सल सोलापुरी भाकरी, पिटलं स्नेह भोजन आहे. आगामी सोलापुरी हुर्डा पार्टी, कृषी पर्यटन केंद्र विकास यावर मार्गदर्शन, प्रदर्शन होणार आहे. या पत्रकार परिषदेस लिंगय्या स्वामी, मयुर गवते, श्रीकांत अंजुटगी, आकाश बसरगी, प्रकाश जाधव, शशिकांत माळी आदी उपस्थित होते .