सोलापूरचे ॲड. अमित आळंगे यांची ठाणे कौटुंबिक न्यायाधीशपदी निवड
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांची ठाण्याचा कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ते मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी पदभार घेणार आहेत.

त्यांनी सन २००८ पासून वकिलीस प्रारंभ केला. ते आजतागायत अर्थात गेली १७ वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करीत आहेत. ते सध्या सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते सोलापूर जिल्हा न्यायालयात दिवाणी फौजदारी कौटुंबिक, ग्राहक मंच, शाळा न्यायाधीकरण, ट्रस्ट न्यायालयात वकिली करीत आहेत. सध्या ते लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे सचिव आहेत. सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे त्यांच्या निरोप सभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मो. सलमान आझमी हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंह राजपूत, प्रमुख कौटुंबिक न्यायाधीश स्मिता घारगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सोलापूर सोलापूर बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड. विजय शिंदे, सचिव ॲड.मनोज पामूल, सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड.विनयकुमार कटारे यांच्यासह बार असोसिएशने पदाधिकारी, वकील मंडळी उपस्थित राहणार आहेत.