मोबाईल मधील shruti.ai या अँप शी बोला अन् क्षणात मिळवा उपयुक्त माहिती!
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरच्या तरुणांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून shruti.ai ॲप विकसीत केले आहे. एआय तंत्रज्ञानाची कमालचं म्हणावी लागेल. मोबाईलसमोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे shruti.ai हे एआय तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केले आहे. याबाबतची माहिती एसएसटी इंडियाचे सीईओ गणेश मद्दा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
shruti.ai या ॲपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती, समस्या किंवा प्रश्न आदींचे त्वरित उत्तर मिळणार आहे. shruti.ai या ॲपमध्ये तोंडी किंवा छायाचित्राद्वारे विचारल्यास त्यासंबंधीची आपल्या शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त आणि विस्तृत माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे. मुलांच्या गृहपाठापासून शेतीतील पेरणीपर्यंत, दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तूंपासून थेट रेल्वे, बस, विमानाच्या वेळापत्रकांपर्यंतची सविस्तर उपयुक्त माहिती या ॲपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्णपणे मोफत मिळणार आहे.
सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील – अथणी, अभियंता स्वप्नाली धोत्रे, गायत्री गुडूर, प्रणाली गुजर, एचआर सुरेश वन्नम, भाग्यश्री गंजी, विनायक सापा, शिरीष बेत यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपयुक्त एआय ॲपची निर्मिती केली आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांच्या गृहपाठाचे छायाचित्र या ॲपमध्ये अपलोड केल्यास गृहपाठातील प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळणार आहेत. एखादी वस्तू सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात कोठे मिळते असा प्रश्न या ॲपमध्ये विचारल्यास तरी त्या वस्तूची आणि संबंधित ठिकाणांची माहिती येथे मिळेल.
शेतकरी बंधूंनी कोणत्याही प्रकारच्या माती, पिकं किंवा झाडांचे केवळ फोटो अपलोड केल्यास कधी पेरणी करावी, पाणी, खते आणि देखभाल कशी करावी याची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागात प्रगतिशील शेती करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांसाठीही हे ॲप मोफत मार्गदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ, ओडिया, फ्रेंच, बंगाली अशा एकूण ११ भाषांमध्ये नागरिकांना माहिती मिळवता येणार आहे.
श्री साई टेक एलएलसी ही कंपनी २०११ मध्ये स्थापन झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ब्लॉकचेन, क्लाउड मॅनेजमेंट आणि वेब/मोबाईल डेव्हलपमेंट या तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. १४ वर्षांहून अधिक अनुभवासह, एसएसटीने हेल्थकेअर, फायनान्स, टेलिकॉम आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि स्केलेबल सोल्यूशन्स प्रदान केली आहेत. एसएसटी इंडिया, ही एसएसटी एलएलसी (यूएसए) एक सहाय्यक संस्था आहे, जी एप्रिल २०२२ मध्ये सोलापूर येथे स्थापन करण्यात आली. यामागील मुख्य उद्देश सोलापूरमधील कौशल्यवान अभियंत्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा आहे, असेही एसएसटी इंडियाचे प्रमुख जयंत आकेन यांनी सांगितले.
प्लेस्टोरवर (playstore) shruti.ai असे सर्च केल्यास हे ॲप मोफत डाऊनलोड करता येईल, असे एसएसटी इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत आकेन यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी (८६००१ ५३०५५ / ९२२६३ ३१९५६) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस प्रकल्प एसएसटी इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत आकेन, अभियंता पूजा पाटील – अथणी, अभियंता स्वप्नाली धोत्रे, गायत्री गुडूर, प्रणाली गुजर, एचआर सुरेश वन्नम, भाग्यश्री गंजी, विनायक सापा, शिरीष बेत आदी उपस्थित होते.