जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली माहिती 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेस दि. ६ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले  यांनी कळविले आहे.

पेरू, मोसंबी व लिंबू पिकाचा फळपिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि . 30 जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली होती.  त्यास पुन्हा मुदत वाढ देण्यात आली असून, ती आता दि. ६ जुलै २०२५ वाढविण्यात आलेली आहे.

image source

प्रधानमंत्री पिक पिमा योजनेंतर्गत पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून फळ पिक विमा भरण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार पेरू, मोसंबी व लिंबू पिकाचा फळपिक विमा भरण्याची अंतिम मुदत  दि. १४ जून २०२५ पर्यंत होती. परंतु, ऑनलाईन पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे सोलापूर जिल्ह्यातून बरेच शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. सदर सर्व पेरू, मोसंबी व लिंबू फळबाग धारक शेतकर्याना कळविण्यात येते कि पेरू मोसंबी व लिंबू पिकाचा फळपिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि. ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. त्यास पुन्हा मुदत वाढ दिली असून, ती आता दि. ६ जुलै २०२५ वाढविण्यात आलेली आहे.

image solurce

  • मुदतवाढ देण्यात आलेल्या फळपिक विमा योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे-

  • पिक पेरू : पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष ३),  विमा भरणा मुदत दि. १४ जून २०२५.  सुधारित विमा भरणा मुदत दि. ६ जुलै २०२५. शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी ३५०० रुपये). विमा संरक्षित रक्कम (७ हजार रुपये).
  • मोसंबी :  पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष ३).  विमा भरणा मुदत दि. १४ जून २०२५.  सुधारित विमा भरणा मुदत दि. ६ जुलै २०२५.  शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी ५ हजार रुपये). विमा संरक्षित रक्कम (१ लाख रुपये).
  • लिंबू : पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष ४). विमा भरणा मुदत दि. १४ जून २०२५. सुधारित विमा भरणा मुदत दि. ६ जुलै २०२५. शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी ४ हजार रुपये). विमा संरक्षित रक्कम (८० हजार रुपये). 

 

 image source

तरी सोलापूर सोलापूर जिल्हातील सर्व डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू, सीताफळ व मोसंबी बाग धारक शेतकऱ्यांनी आपल्या फळ बागेचा विमा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, बँक किंवा आपले सरकार केंद्रास भेट देवून आपली फळबाग विमा संरक्षित करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *