जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांचे प्रतिपादन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : “मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती” सोलापुरात नक्कीच परिवर्तन घडवेल, असे मत जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केले. मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्यावतीने पदग्रहण समारंभात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात रजपूत बोलत होते.
मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्यावतीने समितीच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ब्रह्मदेवदादा माने बँकेचे संचालक व रोटरी क्लब, जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष सचिन चौधरी, ॲड. मंगेश श्रीखंडे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, योगा श्रीराम मिशन संस्थेचे दिपक कोंडा, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या उपस्थितीत पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विष्णू कारमपुरी (महाराज), अतुल कोटा, विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, श्रीशैल वाघमोडे, राजू शिंदे, विश्वनाथ राठोड, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नूतन पदाधिकारी म्हणून समितीचे आधारस्तंभ चंद्रकांत मिठ्ठापल्ली (पुणे), उपाध्यक्ष विश्वनाथ राठोड, उपाध्यक्ष अतुल कोटा, महिला सुरक्षा विभाग पद्मावती गुंडला, शिक्षण विभाग श्रीशैल वाघमोडे, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जगताप, कार्यकारी सदस्य रेखा आडकी, सहसचिव मनिष कोमटी, रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी उपाध्यक्ष राजू शिंदे, कार्यकारणी सदस्यपदी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी जे.एम शिकलकर आदींची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदीपसिंह रजपूत, सचिन चौधरी,मंगेश श्रीखंडे, मुनिनाथ कारमपुरी, यशवंत पवार आदींच्या हस्ते देण्यात आले.
पदग्रहण समारंभास सोहेल शेख, गणेश बोड्डू, गुरुनाथ कोळी, जायेदा शेख, विडी कामगार महिला लक्ष्मीबाई ईप्पा, अनिता संचू, माधवी गौडा, पद्मा म्याकल, गोवर्धन मुदगल, प्रभाकर मुनक्याल, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, प्रशांत जक्का, रौफ नाकेदार, करीम शेख, फिरोज दालियार आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन दादासाहेब निळ, आभार प्रदर्शन विठ्ठल कु-हाडकर यांनी केले.