सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी अर्ज करावेत
By Kanya News||
सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्त्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह येथे खालील प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर पदे भरावयाची आहेत. या पदांसाठी दि १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज केल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांची मुलाखत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी दिली आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह सोलापूर – निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर सहायक वसतिगृह अधीक्षक ०१, उमेदवार हा सैन्यदलातील कमीत कमी हवालदार पदावरून सेवानिवृत्त असावा उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन संगणक हाताळणीचे ज्ञान असावे. सैनिकी मुलींचे वसतिगृह सोलापूर – निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर सहायक वसतिगृह अधिक्षिका ०१- युध्द विधवा किंवा माजी सैनिक विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन संगणक हाताळणीचे ज्ञान असावे’ सैनिकी मुलांचे वसतिगृह सोलापूर- निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर पहारेकरी ०१- पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. सैनिकी मुलींचे वसतिगृह सोलापूर – निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर पहारेकरी ०१ -पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. सैनिकी मुलींचे वसतिगृह सोलापूर – निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर स्वयंपाकी ०१- स्वयंपाकी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. सैनिकी मुलांचे वसतिगृह सोलापूर- निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनवर स्वयंपाकी ०१- स्वयंपाकी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
वरील निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर पदे हि माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाची असून सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक /विधवा पत्नी यांनी आपले अर्ज हे सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक व अनुभवांची कागदपत्रासह दि. १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे सादर करावेत व त्याच दिवशी सकाळी ११ वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे मुलाखत घेण्यात येईल.
तरी पात्र ईच्छुक उमेदवारांनी स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत . सदर पदे भरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल , माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल . पण निव्वळ तात्पूरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर सहायक वसतिगृह अधीक्षक हे पद फक्त माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू माजी सैनिक / युध्द विधवा / माजी सैनिक विधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.