
उमाबाई श्राविका विद्यालयात रंगला वारीचा सोहळा
आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रम
By Kanya News
सोलापूर: उमाबाई श्राविका विद्यालयात आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आषाढी एकादशीचा ग्रंथ दिंडी व रिंगण सोहळा आनंदात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाबाई श्राविका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, दिप्ती शहा, उपमुख्याध्यापिका आश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले इयत्ता पाचवी क या वर्गातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सादर केलेल्या कानडा राजा पंढरीचा या गीताने सर्व वातावरण भक्तीमय होऊन गेले इयत्ता पाचवी सहावीतील विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग गवळणी सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून उप मुख्याध्यापिका पंडित मॅडम यांनी महाराष्ट्रातील संतांची व विविध संतांच्या प्रमुख पालख्यांची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दिली तर वारकरी म्हणजे कोण? व वारी का केली जाते? आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करावी असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.यावेळी निघालेल्या ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या टाळ मृदुंगाच्या गजरात शहरातील सम्राट चौक ते श्राविका संस्था या ठिकाणी या दिंडीचं प्रस्थान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कस्तुरे सर यांनी आभार प्रदर्शन अनंत बळ्ळे सर यांनी केले. तर फलक लेखन प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, माधवी खोत, पल्लवी खांडवे, प्रियंका जैन, सोनाली उंडे, वैभव बारडकर, अभिजित पाटील, ऋषभ सोनटक्के अभिनंदन उपाध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले