१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी.नवी दिल्लीच्या धर्तीवर शासनामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. जुन्नर येथील शबरी शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणारे पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरावेत, असे आवाहन जुन्नर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे.
जुन्नर शाखा कार्यालयास सन २०२४-२५ साठी महिला सबलीकरण योजना (रु. २ लक्ष) – २२, कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु. ५ लक्ष) -६, हॉटेल ढाबा व्यवसाय (रु. ५ लक्ष) – ६, ऑटो वर्कशॉप/ स्पेअर पार्ट (रु. ५ लक्ष)- ६, वाहन व्यवसाय (रु. १० लाखांपेक्षा जास्त व रु. १५ लक्षपर्यंत) – ८ याप्रमाणे योजनानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे.यासाठी कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.