संतसेना नाभिक समाजोन्नती संस्थेतर्फे उपक्रम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : संत शिरोमणी श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संतसेना नाभिक समाजोन्नती संस्था व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर कसबा, नाभिक गल्ली, सोलापूर येथे सेना महाराज मंदिरात हा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट २०२४ व शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ असे दोन दिवस हा सोहळा होणार आहे. यामध्ये गुरुवार, दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता संतोष शंकरराव धोत्रे यांच्या हस्ते अभिषेकाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ ते ५.३० महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायं. ५.३० ते ६.३० वा. प्रवर्चन, रात्री ८ ते ९ ह.भ.प. गणेश वारे (महाराज) यांचे किर्तन होणार आहे.
श्रावण द्वादशी शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रोजी सकाळी ७ बाजता मनोहर मामा क्षीरसागर यांचा अभिषेक सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर (उळे) यांचे गुलालाचे किर्तन, दुपारी १२ वाजता महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मनोहर (मामा) क्षीरसागर, अशोक वाळके, मारुती चिकले, रामभाऊ दिग्गे, पांडुरंग पवार, भारत क्षीरसागर, गणेश वाघमारे, वैजिनाथ शेटे, संतोष धोत्रे, आनंद राऊत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यक्रम पार पाडण्यासाठी क वर्षासाठी उत्सव समितिची निवड करण्यात आली आहे. उत्सव समिती अध्यक्ष नंदकुमार दळवी, सुमीत गवळी, गणेश शिंदे, गणेश चौधरी, केदार शिंदे, निखील दळवी, आदी परिश्रम लाभले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व नाभिक भक्त, समाजबांधवानी गुलाल, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष नंदकुमार दळवी यांनी केले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने सर्व समाज बांधवांनी मदत करावी, असे आवाहन ट्रस्टी उत्सव समितीचे अध्यक्षांनी केले आहे.