
प्रसन्न पब्लिकेशन हाऊस, प्रसन्न फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर
by kanya news||
सोलापूर : प्रसन्न पब्लिकेशन हाऊस, प्रसन्न फाउंडेशनच्यावतीने नगरविकास फाउंडेशनचे प्रमुख संतोष सोनवणे यांना यंदाचा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. नगरविकास फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आंबेडकर अनुयायी भवन असावे, या संकल्पनेला प्रत्यक्षत आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये स्वतःचा संपर्क ठेवून सतत कार्यमग्न असणारे, आंतरजातीय विवाहचा प्रचार-प्रसार करणारे, त्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सहकार्य व मदत, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अनेकांना त्यांच्या मंगलप्रसंगी पुस्तक पी शुभेच्छा देणे, विविध सामाजिक विषयासाठी सतत प्रयत्नशील असणारे या सामाजिक कार्याकरिता दीपस्तंभ प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार रविवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील राहणार आहेत. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉटर अँड मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, उपसंचालक भूमी अभिलेखा पुणे विभागचे अनिल माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृतीभवन, यशवंत नगर, अकलूज या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रसन्ना पब्लिकेशन हाऊसचे अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे नगर विकास फाउंडेशनचे प्रमुख संतोष सोनवणे यांना जाहीर केला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वास हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून, सामाजिक क्षेत्रामध्ये दोन दशकापेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे संतोष सोनवणे यांना जाहीर केला आहे.