सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह येथे अशासकीय पदाची भरती

By Kanya News

सोलापूर :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह व सैनिकी मुलींचे वस्तिगृह येथे अशासकीय पदे भरावयाची असून जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह बुधवार, दि .24 जुलै 2024 रोजी प्रत्यक्ष सैनिक कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे. वरील पदाकरिता त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येणार असून उमेदवारांनी स्वतःची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत.  ही पदे भरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. परंतु अशासकीय सहायक वसतिगृह अधीक्षक हे पद फक्त माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येईल, असे पत्रकात नमूद आहे.

अशासकीय पद  भरतीचा तपशील पुढीलप्रमाणे –

  1. सैनिकी मुलांचे वसतिगृह,सोलापूर :अशासकीय सहा.वसतिगृह अधिक्षक -०१,मानधन रुपये २४४७७/- प्रतिमहा. उमेदवार हा सैन्यदलातील कमीत कमी हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.  02.  सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर : अशासकीय माळी -०१ ,मानधनं रु.१३०८९/- प्रतिमहा. माळी पदाचा अनुभव असणा-यास प्राधान्य.   03.   सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर : अशासकीय सफाई कामगार -०१,मानधन रु.१३०८९/-  प्रतिमहा. सफाई कामगार पदाचा अनुभव  असणा-यास प्राधान्य असल्याचे पत्रकात नमूद आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *