राष्ट्रीय लोक अदालत: स्पेशल ड्राईव्ह ; पाच दिवसांमध्ये ३४४२ प्रकरणे निकाली काढली 

By Kanya News ।।
सोलापूर : लोकन्यायालयाच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच दिवस स्पेशल ड्राईव्ह प्रत्येक प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये सदर पाच दिवसांमध्ये ३४४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघटना, पॅनल विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अधीक्षक शमशोद्दीन नदाफ, सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सदर लोकन्यायालयात एकूण ५७०१९२ प्रलंबित प्रकरणे ठेवलेली आहेत. एकूण ७०८७ प्रंलंबित प्रकरणे तडजोड झालेली आहेत. प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्‍कम ९६५८०३३९३ रुपये अशी आहे. एकूण ६५८९४ दाखलपूर्व प्रकरण ठेवलेली होती. एकूण ४३२६ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीत निघाली. दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्‍कम १७८७५९४४१९/- रुपये इतकी आहे. ऑनलाईन व व्हॉट्सअप (आभासी पध्दतीने) २८ तडजोड प्रकरणे आहेत.४६ तडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे आहेत.

  • ===============================================================================================
  • सदर लोकन्यायालयाची मुद्देसुद माहिती खालीलप्रमाणे :-
  • प्रलंबित प्रकरणे : 
  • एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे – ५७०१९२
  • एकूण तडजोड झालेली प्रंलंबित प्रकरणे – ७०८७
  • ————————————————————————————————————————————————————-
  • प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्‍कम — ९६५८०३३९३/-
  • दाखलपूर्व प्रकरणे :
  • एकूण ठेवलेली दाखलपूर्व प्रकरण — ६५८९४
  • एकूण तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे — ४३२६
  • दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्‍कम — १७८७५९४४१९/-
  • ऑनलाईन व व्हॉट्सअप (आभासी पध्दतीने) तडजोड प्रकरणे – २८
  • तडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे – ४६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact