kanya news
सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सौजन्याने सन 2024-25 या वर्षांकरिता महाराष्ट्राच्या रणजी संघातील संभाव्य खेळाडूंच्या सराव सामन्याला दि. ११ जुलैपासून सुरूवात झाली आहे. हा तीन दिवसीय सामना निवड समिती चेअरमन अक्षय दरेकर, सदस्य रोहित जाधव यांच्या निगराणीखाली आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, सहाय्यक प्रशिक्षक अमित पाटील यांच्या देखरेखीत टीम अ आणि टीम ब मध्ये खेळविण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे दिग्गज खेळाडू तसेच आयपीएल खेळलेले खेळाडू या सामन्यात खेळत असून सदरचा सामना पाडण्यासाठी आज सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सु यांच्या नियोजनात संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यरत असून आज सामना समिती प्रमुख संजय वडजे, के टी पवार, संतोष बडवे, सुनील मालप, किशोर बोरामनी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्या दि. १२ जुलै रोजी सामन्याचा दुसरा दिवस असून खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ पाहण्याची संधी सोलापूरकरांना असल्याचे संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सु यांनी सांगितले.