सोलापुरात राजपूत समाज वधू – वर परिचय मेळावा

By Kanya News||
सोलापूर : राजपूत समाज वधू-वर सुचक मंडळ यांच्यावतीने रविवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी मुरारजी पेठ येथील राघवेंद्र स्वामी मठाजवळ, सुशील रसिक सभागृह येथे सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत पहिले राज्यस्तरीय राजपूत वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उज्वल दिक्षीत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजपूत समाजातील या मेळाव्यात राजपूत समाजातील विवाह योग्य युवक-युवतीनी सहभागी व्हावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या मेळाव्यानिमित्त वधू- वर परिचय पुस्तिका ही प्रकाशित करण्यात येणार असून, त्याचे राज्यभर वितरण होणार आहे. या मेळाव्याचा उद्देश वेळेची व पैशाची बचत व्हावी हा आहे. या परिचय पुस्तिकेत समाजातील .उच्च पदावर असणा-या व्यक्तीनी व व्यावसायिकांनी शुभेच्छापर जाहिरात करुन सहकार्य करावे. सोलापूर राजपूत वधू-वर सुचक मंडळ सोलापूर समर्थ सहकारी बॅक. लि. सोलापूर शाखा दत्त चौक, खाते क्रमांक 3010, (IFC CODE SBL 50000001) या खाते क्रमांकावर परिचय पत्रिका रजिस्ट्रेशन शुल्क ६०० रुपये रोख अथवा डिमांड ड्राप्ट NEFT-RTGS द्वारे मेळाव्यासाठी परिचय पत्र ( बायोडाटा ) जमा करावेत. मेळाव्याची अंतिम – नोंदणी तारीख दि. १ ऑगस्ट २०२४ आहे.

मेळाव्यासाठी नोंदणी करणा-या युवक युवतीसह परिवारातील सदस्यांसाठी आसन व्यवस्था परिचय पुस्तिका सकाळी ९ ते ११, चहा, नाष्टा, दुपारच्या जेवणाची व्यवस्था तसेच पत्रिका बघण्यासाठी ब्राम्हणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच दोन कॅमेरा, दोन स्क्रीन, मुला-मुलींच्या माता-पितांना चर्चा करण्यासाठी स्वतंत्र खोलीमध्ये व्यवस्था संयोजकानी केली आहे. या मेळाव्यास राजपूत युवक-युवतींनी व पालकांनी वधू-वर, घटस्पोटीत, विधवा, मुला-मुलींनीदेखील सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी (९४२२४५९२०४ / ९९७५२३८९९९) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक, अध्यक्ष प्रतापसिंह चौहान यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस अजयसिंह पवार, अमितसिंग पवार, गुलजारसिंह चौहान, सुरजसिंह पवार, बालाजी पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact