आता बंगळुरू – कलबुर्गी विशेष एक्सप्रेस धावणार

by kanya news||

 सोलापूर :  प्रवाश्यांची वाढती मागणी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू – कलबुर्गी  विशेष एक्सप्रेस विशेष शुल्कासहित चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनांने घेतला आहे.

 गाडी क्र. ०६५३३/०६५३४ सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू – कलबुर्गी – सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू  या एस्कप्रेसच्या सहा फेऱ्या होतील.  गाडी क्र. ०६५३३ सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू – कलबुर्गी  या विशेष एक्सप्रेसच्या तीन फेर्या होतील.   अधिसूचित  दि. १४, १६  आणि दि. १७ ऑगस्ट २०२४  रोजी अनुक्रमे सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू रेल्वे स्थानकाहून रात्री  ९.१५  वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५  वाजता  कलबुर्गी  रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०६५३४ कलबुर्गी – सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस  या बंगळुरू  विशेष एक्सप्रेसच्या तीन फेर्या होतील.    अधिसूचित  दि. १५,१७  आणि दि. १८ ऑगस्ट २०२४   रोजी अनुक्रमे  कलबुर्गी रेल्वे स्थानकाहून सकाळी ९.३०  वा नि निघेल. त्याच दिवशी रात्री ८  वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू रेल्वे स्थानकावर दाखल होईल.

या विशेष एक्सप्रेसला येलहंका, धर्मावरम जं., अनंतपूर, गुंतकल जं., अदोनी, मंत्रालयम रोड, रायचूर, यादगीर, वाडी, शाहबाद, असे थांबे असणार आहेत. याची संरचना १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, १ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन अअशी आहे. यास एकूण १८ कोच असतील.  

विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आधीच सुरू आहे. वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact