सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून सोलापूर-वाडी सेक्शनमधील विविध कामांची पाहणी
By Kanya News||
सोलापूर : सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून सोलापूर-वाडी सेक्शनमधील विविध कामांची पाहणी केली. सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून सोलापूर -वाडी सेक्शन मधील विविध कामाचे निरीक्षण करून टिकेकर वाडी रेल्वे स्थानकावर नवीन तयार होत असलेल्या मेघा टर्मिनलची पाहणी केली.
अक्कलकोट, दुधनी गाणगापूर, कलबुर्गी, वाडी आणि शहाबाद रेल्वे स्टेशनवर सुरु असलेल्या अमृत स्टेशनअंतर्गत कामाची पाहणी केली. सदरच्या कामाबद्दलची सद्यस्थितीची माहिती गती शक्ती युनिटचे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (CPM) शैलेंद्रसिंह परिहार यांनी कामाबद्दलची माहिती दिली.
कलबुर्गी रेल्वे स्थानकावरील रनिंग रूमची पाहणी केली. वाडी रेल्वे स्थानकावर नवीन तयार होत असलेल्या रेल्वे हॉस्पिटलची पाहणी केली. हॉस्पिटल सुरु असलेल्या कामाची माहिती विभागीय मेडिकल अधिकारी रघुनंदन यांनी माहिती दिली.
यावेळी, गती शक्ती युनिटचे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (CPM) शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ विभागीय अभियंता( समन्वय ) सचिन गणेर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे एन गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) जगदीश, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता( टीआरडी ) अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता (जनरल) अभिषेक चौधरी, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी पी. रामचंद्रन,वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे या प्रमुख अधिकाऱ्यांसमावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.