प्रल्हादनगरच्या बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळ, मॉर्निंग क्रिकेट क्लबचा उपक्रम
by kanya news ||
सोलापूर : प्रल्हादनगर येथील बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळ आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रल्हादनगर यांच्या विद्यमाने दि. ३१ ऑगस्ट २०२४ पासून टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा विजयपूर रोडवरील ए.जी. पाटील कॉलेज समोरील बाजूस असलेल्या मैदानावर दर शनिवार आणि रविवारी होतील. मात्र याचा शुभारंभ दि. ३१ ऑगस्टपासून होणार आहे. स्पर्धा संपेपर्यंत हे सामने दर शनिवार आणि रविवारी खेळविण्यात येतील.
image source
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ५००१ रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. द्वितीय क्रमांकासाठी ३००१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी २००१ रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वोकृष्ट अष्टपैलू यासाठी २५१ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. प्रत्येक संघात आठ खेळाडू समाविष्ट असतील. प्रत्येक सामना सहा षटकांचा होईल. गोलंदाजांनी नियमाप्रमाणे गोलंदाजी केली पाहिजे. चेंडू सामना समिती उपलब्ध करून देणार आहे. सामन्यावेळी विकत घ्यावा लागेल. प्रत्येक संघाची प्रवेश फी ५०० रुपये असेल. प्रवेश फी जमा केल्याशिवाय त्या संघाचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही.
सामना समितीनुसार पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळातर्फे या क्रिकेट स्पर्धेचे दुसरे वर्ष असून, दि. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत संघांनी नाव नोंदवून क्रिकेट स्पर्धेची चुरस वाढवावी. अधिक माहितीसाठी महेश तांबुळकर ( ९९२२१८५४३०/९३०७२०२५३५), ॲड.इरेश स्वामी (९५६१९०४३०१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाप्पा मोरया गणेशोत्सव मंडळ व मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रल्हादनगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.