पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २४२ उमेदवारांची प्राथमिक निवड
सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर व सोलापूर (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त “नॉर्थ कोट प्रशाला, पार्क चौक, सोलापूर” येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. रोजगार मेळाव्याचे उध्दाटन विशाल मडके, सहायक नियोजन अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. . या रोजगार मेळाव्यात ७४० नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यामधून एकूण १२ उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतींद्वार २४२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सचिन धुमाळ, जिल्हा व्यावसाय शिक्षण अधिकारी, सुरेश भालचिम, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी, भिमाशंकर कोडगुळी, प्रशिक्षणार्थी सल्लागार मान्यवर उपस्थित होते.
१५ नामांकित उद्योजकांचा सहभाग
औद्योगिक परिसरातील १५ नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला होता. त्यांच्याकडून एकूण १९९६ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली होती. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी (550), १२ वी (150), पदबीधर, बी.ए., बी.कॉम, डिप्लोमा, इंजिनिअरिंग (ए.क), बी.एससी, एम.एससी, फिटर, वेल्डर, इलेक्टीशीयन, आय.टी.आय, बी-फर्म, डी-फार्म, बँकींग, नरसिंग, लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल, मॅकेनिकल, इत्यादी अशा विविध पात्रताधारक उमेद्वारांसाठी असून, सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या ‘ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या