सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Adress : Well Fashion, Tuljapur Ves, Solapur. Contact No. 9881050015

By Kanya News

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागानी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत लक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. भक्तनिवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्व शासकीय विभाग प्रमुख त्यांच्यावर वारीच्या पार्श्वभूमीवर सोपवण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. परंतु शेवटचे तीन दिवस महत्त्वाचे असून प्रत्येकाने अत्यंत दक्षपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, आषाढी वारीनिमित्त दि. जुलै 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री च्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकी

 

य महापूजा होते. यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मागील दो

न महिन्यापासून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सांगण्यात आलेले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact