पंढरपुरातील तनपुरे महाराज मठात होणार प्रकाशन
By Kanya News।।
सोलापूर : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त चंद्रशेखर पाटील लिखित भांडवलशाहीचे भक्ष्य: शेतकरी आणि कामगार पुस्तकाचे शनिवारी (दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी) प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरत-चेन्नई एक्सप्रेस-हायवे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अड. महारुद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
-
भारतातील शेतकरी आणि शेतीच्या लुटीचे सूत्र शोधणारे “भांडवलशाहीचे भक्ष्य: शेतकरी आणि कामगार” या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.३ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजता तनपुरे महाराज मठ, पंढरपूर येथे शेतकरी नेते राकेश टिकैत, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे-पाटील, ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, सांगोला कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे, हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मावळा युवा महासंघ, महाराष्ट्र यांनी आयोजित केला आहे.
या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर पाटील हे सांगलीचे असून, ते व्यवसायाने एक अभियंतादेखील आहेत. यादरम्यान सुरत-चेन्नई एक्सप्रेस-हायवे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अड. महारुद्र जाधव यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, शेती शेतमाल, महाराष्ट्रातील भूसंपादन समस्या, शेतकऱ्यांची आणि व्यक्तित होणारे ससे हेलपाटे, खतांची आणि बियाणांची समस्या, शेतीतील विजेची समस्या आदी विषयांवर तोडगा काढण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी राकेश टिकैतयांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परीषदेस अमित ढोले, गणेश मगे, आदी उपस्थित होते.