पद्मनगर स्पोर्ट्स क्लबच्या मुलींचा संघ उपविजेता : १४ वर्षांखालील आंतरशालेय मुलींची बास्केटबॉल स्पर्धा

सोलापूर : १४ वर्षांखालील आंतरशालेय मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर स्पोर्ट्स क्लबच्या मुलींच्या उपविजेत्या संघासोबत प्रशिक्षक श्रीधर गायकवाड.
By Kanya News ।।
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित १४ वर्षांखालील आंतरशालेय मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर स्पोर्ट्स क्लबच्या मुलींचा संघ उपविजेता ठरला.
पुंजाल मैदान येथे झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल क्लबने उपविजेतेपद पटकाविलेल्या संघात कर्णधार कृतिका उडानशिव, वैष्णवी होले-पाटील, शेजल येदूर, ऋषिता मोने, निहारिका मोने, वैशाली, रोशनी ताटीपामुल, बालत्रिशा कामुतीॅ, श्रेया यनगंटी, प्रवलिका कोंडले, संजना उकळी, अकिला कोंडले यांचा समावेश होता.
या खेळाडूंनी चांगला खेळ करीत संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. या यशाबद्दल पद्मनगर बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोलीकर, आनंद वल्लाकाटी, श्रीशैल गुरव, सुशील नाटकर, स्वाती कोठे यांनी अभिनंदन केले.