शास्त्रज्ञ अंकिता नगरकर-देगील ; नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

by kanya news||

सोलापूर : “भारत हा शास्त्रज्ञांचा देश बनावा” हे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, असे प्रतिपादन युवा शास्त्रज्ञ अंकिता नगरकर-देगील यांनी केले.    नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नगरकर-देगील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी  संस्थाध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, संचालक योगीनाथ करजगी, सोमनाथ करजगी, नंदिनी करजगी, यशराज करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्री प्रायमरी इंचार्ज अनिता अनगोंडा उपस्थित होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन काजल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या  विज्ञान प्रदर्शनात ४०० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रयोग प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. यामध्ये जल शुद्धीकरण, सोलापूर स्मार्ट सिटीसाठी विजेचे पाच उपाय, चांद्रयान, ग्रीन बिल्डिंग, इलेक्ट्रिक स्केट बोर्ड, थ्रीडी प्रोजेक्टर, रिचार्जेबल टेबल फॅन, पवन चक्की, ऊर्जेची निर्मिती, सोलार प्रकल्प, पाण्याचे नियोजन, मोहेंजोदडो संस्कृती, भारतीय लोकशाही अशा विविध प्रयोगांचा समावेश होता. रोबोटिक्स, टोकिंग ट्री, स्काऊट गाईड, मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र, गणित यावर आधारित प्रयोग आणि आदिवासींच्या वस्तूंचे दालन हे प्रदर्शनातील विशेष आकर्षण होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact