निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना;
अडचणी सोडवण्यासाठी तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर
कार्यालयीन वेळेत महिला लाभार्थ्यांनी हेल्पलाइन क्रमांकाचा लाभ घ्या
by kanya news ||
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून जवळपास सहा लाख अर्ज मंजूर झालेले आहे. दि. ऑगस्ट २०२४ पासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर माहे जुलै व ऑगस्ट २०२४ या दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात. या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहाय हेल्पलाइन सुरु करण्यात आले आहे.
==============================================================================
तालुका निहाय हेल्पलाईन पुढील प्रमाणे..
- माढा : मारुती ताटे, संरक्षण अधिकारी (मोबा.नं.८९९९४६८९९३)
- करमाळा-: (०२१८१- २२२०३५७)
- मंगळवेढा : दारोळे प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास, मंगळवेढा (मोबाईल नं. ९९६०२४७२७२७५)
- सांगोला : (०२१८१-२२०२१८)
- पंढरपूर :(०२१८६-२२३५५६)
- मोहोळ : (०२१८९-२३२२३४)
- माळशिरस : आत्तार, प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास, माळशिरस (मो.नं. ९८३२२७१८८६/ ०२१८५- २३५०५६)
- अक्कलकोट : मिलिंद घाटगे, संरक्षण अधिकारी (९०४९११३२८२), मृणाली शिंदे, विस्तार अधिकारी पंचायत समिती, अक्कलकोट (९४२०३५८३५५)
- दक्षिण सोलापूर : मिलिंद घाटगे, संरक्षण अधिकारी (९०४९११३२८२)
- बार्शी : शैलेश सदाफुले, विस्तार अधिकारी पंचायत समिती, बार्शी (९५४५९८८९९८), सुरज काटकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, बार्शी (९६७३७३७२१३)
- उत्तर सोलापूर : (०२१७-२७३१०१४)