मोहन भूमकर यांची एकमताने निवड
by kanya news||
सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल क्लबअंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन शंकरसा भूमकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मोहन भूमकर हे गेल्या ३३ वर्षांपासून लायन्स क्लबमध्ये कार्यरत आहेत. या काळात त्यांनी झोन चेअरमन, लीडरशीप चेअरमन, कॅबिनेट ऑफिसर तसेच माजी अध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. ते सोलापूर जिल्हा तायक्वॉन्दो स्पोर्टस् कौन्सिलचे विद्मामान अध्यक्ष, हरिओम विणकर बाग सुप्रभात मंडळ, गुरुविद्या प्रतिष्ठान या संस्थेवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.