१२ क्रीडा प्रकाराच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करण्या-या अकादमीला मदत 

 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग हॉकी लॉनटेनिस, रॉइंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, पेटलिटींग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकाराच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करण्या-या खाजगी अकादमीना  आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अदयावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वेदकशास्त्र, क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

                                                                                                                     image source

 

  • मिशन लक्ष्यवेध या महत्वांकाक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग हॉकी लॉनटेनिस, रॉइंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, पेटलिटींग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकाराच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करण्या-या खाजगी अकादमीना  आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

                                                                                                                 image source

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरीचे गुणांकन करण्यात येऊन 35 ते 50 गुण प्राप्त करणा-या संस्था क वर्ग, ५१  ते ७५  गुण प्राप्त करणा-या संस्था व वर्ग व ७६  ते १००  गुण प्राप्त करणा-या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादर्मीना वार्षिक १० लक्ष रुपये,  ब वर्ग अकादमींना वार्षिक २० लक्ष रुपये  आणि  अ वर्ग अकादमींना वार्षिक ३० लक्ष रुपये आर्थिक सहाय्य, पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी  बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.

तरी  इच्छूक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.  सदर योजनेचा जास्तीत जास्त संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact