सोलापूर जिल्हा महिला, पुरुष सेपक टकरा स्पर्धेचे तेजस्विनी कदम यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
By Kanya News।।
सोलापूर : महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि सोलापूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशन सोलापूर यांच्यावतीने इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील क्रीडा संकुल हॉलमध्ये पुरुष व महिला सेपक टकरा स्पर्धा व निवड चाचणी पार पडली.या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका तथा इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर : इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील क्रीडा संकुल हॉलमध्ये आयोजित पुरुष व महिला सेपक टकरा स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी रामचंद्र दत्तू ,यतिराज वाकळे, प्राचार्य प्रशांत यादव, रवींद्र चव्हाण, संभाजी पवार, सरस्वती पवार, क्रीडाशिक्षक आण्णा वाकडे, संभाजी हेगडे आदी.
यावेळी सोलापूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू ,यतिराज वाकळे, माध्यमिक आश्रम शाळा येड्रावचे प्राचार्य प्रशांत यादव, सोलापूरचे रवींद्र चव्हाण, संभाजी पवार, सरस्वती पवार, क्रीडाशिक्षक आण्णा वाकडे, संभाजी हेगडे यांच्यासह शिक्षक, खेळाडू उपस्थित होते .
या स्पर्धेतून दि. ९ ते ११ ऑगस्ट २०२४ दरम्यान ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पुरुष व महिला सेपक टकरा स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये निवड सदस्य म्हणून आण्णा वाकडे, प्रशांत यादव, रवींद्र चव्हाण यांनी काम पाहिले.