मंद्रूपमध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिरास माता-भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Kanya News|
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मंद्रूप येथे माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मोफत नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यास माता-भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी समाजसेवक जिलानीभाई सगरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सरचिटणीस विशाल गायकवाड, भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन रणखांबे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, अमोल गायकवाड, शिवपुत्र जोडमोटे यांच्यासह माता-भगिनीची मोठी उपस्थिती होती.