महसूल पंधरवडा: महा मॅरेथॉन रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 by kanya news||

सोलापूर : महसूल पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यावतीने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी आयोजित महा मॅरेथॉन रॅलीमध्ये  राजश्री नगाले, चंदू राठोड या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले.  ही रॅली श्री सिद्धेश्वर वनविहार ते विनायक सांस्कृतिक भवनपर्यंत आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचा शुभारंभ महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून  केला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,  एनसीसी विभागाचे मेजर ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, होमगार्ड विभागाचे इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या महा रॅली मॅरेथॉनमध्ये दयानंद, वालचंद कॉलेजचे विद्यार्थी, होमगार्ड, अग्निशामक आणि क्रीडा विभागाने सहभाग नोंदवला होता. ही महा मॅरेथॉन रॅली श्री सिद्धेश्वर वनविहार ते विनायक सांस्कृतिक भवन या दरम्यान आयोजित करण्यात आली होती.यावेळी  पंच म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, राजू प्याटी, सुनील पवार यांनी   काम पाहिले.

  महा मॅरेथॉन रॅलीच्या समारोपप्रसंगी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी या मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात येते. अशावेळी माणसाचे मन आणि शरीर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तंदुरुस्त आणि खंबीर असायला हवे.  या महा मॅरेथॉन रॅलीतील प्रथम क्रमांक विजेती विद्यार्थिनी राजश्री नगाले आणि  विद्यार्थी चंदू राठोड यांना प्रमाणपत्र, पदक आणि पुष्पगुच्छ देऊन  अभिनंदन केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact