समाजकारण आणि राजकारण : उत्कृष्ट समीकरण

by kanya news||

सोलापूर : समाजकारण ते राजकारण असा एक आगळावेगळा समाजात ठसा उमटविणारे समाजकारक म्हणून सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात महादेव कोगनुरे यांनी एक नवी आणि प्रभावशाली छाप सोडली आहे.  अल्पावधीतच  लोकप्रिय व्यक्तिमत्व बनलेले,  राजकारण आणि समाजकारण अशी समाजाची कास-नाळ धरून चालणारे अशी त्यांची ख्याती निर्माण झाली आहे. अल्पावधीतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कुशल व्यक्तिमत्व आणि हजरजबाबीपणामुळे एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व म्हणून महादेव कोगनुरे यांच्यारूपी एक सामाजिक कार्यकुशल, कार्यसम्राट व्यक्तिमत्व उदयास आले आहे. गोर-गरीब आणि गरजूंच्या मदतीला तत्परतेने धाऊन येणारे महादेव कोगनुरे यांनी  समाजकारण आणि राजकारण याची एक छानशी सांगड घालून जनमानसात आपला एक वेगळाच ठसा उमटविला आहे.

सद्या सर्वत्र राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्व पक्षीय नेत्यांशी महादेव कोगनुरे यांचे व्यक्तीगत संबंध जरी  मधूर असले तरी त्यांची कुशल कार्यता आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुखात सदैव तत्परतेने खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची सामाजिक कार्यकुशलतेमुळे आता अनेकांच्या भुवया उंचऊ पाहत आहेत.  समाजकारण ते राजकारण आणि आता राजकीय वर्तुळातदेखील जनमानसात आणि सर्वसामान्यांच्या मना-मनात वसलेले, गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि घरोघरी आपल्या कुशल कार्य आणि नेतृत्व यामुळे ते जनमानसात लोकप्रिय व्यक्तीमत्व बनले आहेत. जनमानसात  वसलेले व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख अबू ख्याती निर्माण झाली आहे. सदाबहार व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावाची सध्या सुरु असलेली चर्चा आणि सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे मधूर  संबंध असून, आता या मधूर संबंधाची त्यांच्यारुपी राजकीय क्षेत्रात साखर पेरणी होईल का? अशी  राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

एम.के. फाउंडेशनच्या माध्यमातून  महादेव कोगनुरे यांनी समाजकारणात गेल्या दहा वर्षांपासून विविध विधायक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या चौफेर समाजाभिमुख उपक्रमाद्वारे समाजकारणात एक  वेगळेच रंग भरताना दिसत आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे. महादेव कोगनुरे यांच्याबद्दल सध्या सामाजिक आणि राजकीय वातावरण फीलगुड आहे.

आगामी  विधानसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी  जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीसाठी फॉर्मदेखील  भरला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत समाजकारण आणि राजकारण अशी एक उत्कृष्ट सांगड घालून आपला राजकीय योग जुळवून आणण्यासाठी महादेव कोगनुरे आणि त्यांचे समर्थक जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

  •  महादेव कोगनुरे यांनी कधीही नौटंकीबाज राजकारण, समाजकारण  केले नाही. एक सच्चा समाजसेवक  म्हणून त्यांनी काम केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास,  शेतकरी, गोर-गरीब आणि सर्व सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव कटीबद्ध आणि तत्पर आहेत.  सर्वांच्या निगडीचा असा पाणीप्रश्न,  विजेचा प्रश्न,  आरोग्य यासह रस्त्याचा प्रश्न अशा अनेक विधायक बाबींकडे त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्या सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रामाणिकपणे  प्रयत्न राहिलेला आहे. सर्व-सामन्यांच्या न्याय-हक्कासाठी सातत्यपूर्ण लढा लढताना दिसून येत आहेत. त्यामुळे  जनमानसातील एक चेहरा म्हणून आता  जनता महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार , असे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact