image source 
image source
रिपाइंचा शहर, जिल्ह्यात १,१११६७ वृक्ष लागवड, वह्यांच्या वाटपाचा संकल्प;
नांदणीत ५५६७ वृक्षांची लागवड करणार
by kanya news||
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री, लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सोलापूर शहर व जिल्हा यांच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून हा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतुल नागटिळक व सुशील सरवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष, लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिम्मित हार-तुरे-बुकेंवर होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोर-गरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणार्या वह्या भेट स्वरुपात द्याव्यात. जेणे करून समाजातील होतकरू मुलांना याचा उपयोग होईल. त्यासाठी वाढदिवसानिमित्त वह्या भेट देऊन रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष, लोकनेते राजाभाऊ सरवदे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन अतुल नागटिळक व सुशील सरवदे यांनी केले आहे.
=============================================================================
१,१११६७ वृक्ष लागवड, वह्या वाटपाचा संकल्प
गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे रिपाइंच्यावतीने संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यात १,१११६७ (एक लाख अकरा हजार एकशे सदूसष्ट) वृक्ष लागवड व (एक लाख अकरा हजार एकशे सदूसष्ट) वह्यांचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, पहिल्या टप्प्यात दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी रिपाइंचा पक्षाच्यावतीने “दक्षिण सोलापूर वनपरिक्षेत्र नांदणी येथे ५५६७ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.”
===============================================================================
हार-तुरे-बुकेंवरील अनावश्यक खर्च नको, शैक्षणिक साहित्य स्वरुपी सत्कार करण्याचे आवाहन
- वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या हार, पुष्पगुच्छ अशा सत्काराचे स्वरूप टाळून, रिपाइंचे सर्व कार्यकर्ते व लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने व कार्यकार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्य स्वरुपी सत्कार करावा. हे साहित्य नंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. पक्षाच्यावतीने पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक उन्नतीकडे एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
========================================================================
रुग्णांना फळे वाटप
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रक्तदान, महाआरोग्य, प्रशिक्षण आदी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाने नाकारलेल्या लोकांना ब्लॅकेट वाटप, प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप, अन्नदान वाटप, होम मिनिस्टर, अनेक शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन आदी सारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
==============================================================================
अभीष्टचिंतन सोहळा नियोजन समिती गठीत
रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष, लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिम्मित राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमासाठी सोलापूर शहर जिल्हा अभीष्टचिंतन सोहळा नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर श्यामसुंदर गायकवाड, अतुल नागटिळक, पवन थोरात, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, तात्यासाहेब काळे, बाबासाहेब माने, दत्ता वाघमारे, श्याम धुरी यांची निवड करण्यात आली आहे.