“लोकमंगल”च्या कृषिदुतांची पेनुरातील दुग्ध व्यवसायास भेट
By Kanya News ।।
सोलापूर : वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी-कृषिदुतांनी पेनूर येथील सागर नागनाथ चवरे यांच्या दुग्ध व्यवसायाच्या डेअरी फार्मला भेट देऊन दुग्ध व्यवसाय आणि गायींचे संगोपन, निगा-देखरेख कशी केली जाते त्यांचे व्यवस्थापन कशा पद्बतीने केली जाते, याविषयीची माहिती घेतली.

सोलापूर :“लोकमंगल”च्या कृषिदुतांची पेनुरातील सागर नागनाथ चवरे यांच्या दुग्ध व्यवसायास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कृषिदूत सुदेश मोरे, किसन घाडगे, गुरुप्रसाद भारती, रोहन पवार, शुभम खोमणे उपस्थित होते.
सागर चवरे यांच्या गोठ्यामध्ये तब्बल ८४ गायी आणि २५ कालवडी आहेत. त्यांचा गोठा १००×६० चौरस फूट जागेचा आहे. गोठा पद्धत हेड-टू-हेड आहे. चाऱ्यामध्ये ऊसाचा मूरघास व ओला नेपियर घास आहे. मुख्यत्वे या सर्व गायी बारामती व लोणी येथील गायी बाजारातून विकत घेतलेल्या आहेत. या सर्व गायी आठ ते दहा लिटर प्रतीवेळी दूध देतात. त्यातील ६५ गायी या दुभती आहेत. सर्वसाधारणपणे एकाचवेळी ४५० ते ५०० लिटर दुधाचे उत्पन्न मिळते. दोन्ही वेळेचे अंदाजे १ हजार लिटर दूध मिळते. या गटाचे सर्व काम व्यवस्थापक समाधान चव्हाण पाहतात. यावेळी व्यटस्थापकांनी कृषिदूतांना गोठ्यावरील चालणारे सर्व कामकाजाविषयी माहिती दिली. दैनंदिन कामाची माहिती व व्यवस्थापन व्यविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी कृषिदूत सुदेश मोरे, किसन घाडगे, गुरुप्रसाद भारती, रोहन पवार, शुभम खोमणे उपस्थित होते.