११ शिक्षक, २ शाळांना सन्मानित करणार

By Kanya News||

सोलापूर : लोकमंगल  फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने सोलापूर  जिल्ह्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कारांसाठी गुणवत्तावान शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यंदा ११ शिक्षकांना  लोकमंगल शिक्षक रत्न तर  दोन शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत, अशी माहिती लोकमंगल पुरस्कार समितीच्यावतीने डॉ. ह. ना. जगताप  व ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार योजनेत प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय क्रीडा शिक्षक व कला शिक्षक यांनाही सन्मानित केले जाते. अध्यापन सेवेमध्ये विशेष उल्लेखनीय सेवा बजावत विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार दिला जातो.  सोलापूर जिल्ह्याची कीर्ती जगभरात पसरवणाऱ्या गुणवत्तावान विद्यार्थ्याला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाला डॉ.अब्दुल कलाम पुरस्कार दिला जांतो. अशा अकरा शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.  सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

=========================================================================

  • असे आहे पुरस्काराचे स्वरुप :  

या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि अडीच हजार रुपयांची पुस्तके असे आहे.

  • अर्ज करण्यासाठी निकष :

बारा वर्षापेक्षा अधिक सेवा बजावलेल्या कोणत्याही शिक्षकाला या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्जावर माहिती भरून संबंधित शिक्षकांना प्राप्त झालेली प्रमाणपत्रे जोडून प्रस्ताव सादर करावा लागेल.

  • अर्ज करण्याचा पत्ता :

विहित नमुन्यातील अर्ज लोकमंगल पतसंस्था किंवा लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी संस्था. यांच्या  कोणत्याही शाखेत उपलब्ध असेल.   शिवाय हा विहित नमुन्यातील अर्ज लोकमंगल फाऊंडेशनच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध असेल.   पुरस्कारासाठी दाखल केले जाणारे प्रस्ताव नमूद  पत्त्यावर आणून द्यावे लागतील.

  • पत्ता :- अन्नपूर्णा, १३ /अ,  सह्याद्री सोसायटी, इएसआय हॉस्पिटलच्या मागे, बिकास नगर, होटगी रोड सोलापूर. 

इच्छुक शिक्षकांना आणि शाळांना प्रस्ताव दाखल करण्याचा शेवटचा दिवस दि. २०  ऑगस्ट २०२४  हा असेल.  अधिक माहिती व संपर्कासाठी ( ०२१७- ०६०६०७० किंवा ७७२२०३९६१७)  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस  दिपाली कोठारी, तानाजी माने, मारुती तोडकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact