लायन्सचे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन मोरपीस सोलापुरात
By Kanya News||
सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट- ३२३४ डी-१ चे डिस्ट्रिक कॅबिनेट इन्स्टॉलेशन मोरपीस सोलापुरात रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी होणार आहे, अशी माहिती डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऍड. एम. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमासाठी पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर विनोद खन्ना हे दिल्लीहून येणार आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर अभिजीत धर्माधिकारी (संभाजीनगर) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
डिस्ट्रिक्ट- ३२३४ डी-१ हा सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याचा काही भाग या सर्व महसुली जिल्ह्यांचा मिळून बनलेला आहे. या डिस्ट्रिक्टमध्ये एकूण ८० क्लबचा समावेश आहे. डिस्ट्रिक्टची सभासद संख्या ही एकूण २७४० एवढी आहे. डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन मोरपिससाठी या सर्व जिल्हातील एकूण साडेचारशे ते पाचशे लायन्स सभासद उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर शहरामध्ये एकूण आठ क्लब आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १९ लायन्स क्लब कार्यरत आहेत. ८०० पेक्षा जास्त सदस्य सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजसेवेचे कार्य करतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये लायनीजमची सुरुवात १९६१ साली झाली. तेंव्हापासून आजतागायत सोलापूर जिल्ह्यामध्ये लायनीझमची चळवळ जोमाने सुरु आहे. यावर्षी म्हणजेच दि. १ जुलै पासून ऍड. एम. के. पाटील हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत . हि डिस्ट्रिक्टचा बहुमान सोलापूरला लायन ऍड. एम.के. पाटील यांच्या रूपाने सातव्यांदा मिळत आहे. याआधी लायन डॉ. नारायणदास चंडक, डॉ.गुलाबचंद शहा-कासलीवाल, अशोक मेहता, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, अरविंद कोणशिरसगी यांच्या रूपाने हा बहुमान सोलापूरला मिळाला होता. सन २०१८ नंतर यावर्षी प्रथमच हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शिपचा बहुमान सोलापूरला परत एकदा मिळत आहे.
ऍड. एम.के. पाटील गे स्वतः मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे प्रांतपाल पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी आणि शपथ घेण्यासाठी गेले होते. लायन्स संघटनेची स्थापना सन १९१७ साली मेल्वीन जोन्स या इन्शुरन्स या एजन्टनी केली. तेंव्हापासून आतापर्यंत गेल्या १०७ वर्षात लाईनिझम हा संपूर्ण जगामध्ये पसरला आहे. जगातील एकूण २०९ देशांमध्ये १३ लाखांपेक्षा जास्त सदस्य संख्या हा लायन इंटरनॅशन एकूण ४६००० क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहे. शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील शंभर वर्षासाठी समाजसेवेची काही उद्दिष्ट लायन्स नी घेतलेली आहे.
त्यामध्ये मधुमेह, पर्यावरण, आपत्कालीन सेवा, लहान मुलांमधील कॅन्सर, भुकेल्याना अन्न,दृष्टी, युवा, माणूसकीसाठीची सेवा या सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचे पुढील शंभर वर्षांमध्ये निश्चित केले आहे. ऍड. एम.के. पाटील यांनी यावर्षी लायन्सची सभासद संख्या वाढवणे आणि लायनीजम तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये एकाच प्रकारची सेवा कार्ये केली जाणार आहेत. त्यांना त्यांनी मेगा इव्हेंट्स असे नाव दिले आहे. रक्तदान, वृक्षारोपण, रस्ता सुरक्षा आणि जुळ्यांसाठी प्रबोधन अशा चारही क्षेत्रामध्ये यावर्षी मेगा इव्हेंट्स राबवले जाणार आहेत. असे आवाहन ऍड. एम. के.पाटील यांनी सर्व लायन्सना केले आहेत. मोरपीस डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन हे या वर्षी सुरुवातीचा शपथ व पदग्रहण विधी होणार आहे. या पत्रकार परिषदेस ऍड. एम. के. पाटील, सेकंड व्हॉईस राजेंद्र शहा (कासवा), पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि कन्व्हेनर डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी डॉ. अभिजीत जोशी, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर महेश नाळे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऍडव्हाझर माणिक गोयल, डिस्ट्रिक्ट सीईओ गंगाप्रसाद बंडेवार आदी उपस्थित होते.