मनोर्याखालीच आत्मदहन करण्याचा इशारा

By Kanya News||

सोलापूर : धोत्री ते कुंभारी सबस्टेशनपर्यंतच्या १३२ के.व्ही. अति उच्चदाब पारेषण वाहिन्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोर्याने व्याप्त जमीन, वाहिनीच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसानभरपाईपोटी मोबदला तातडीने ण मिळाल्यास येत्या दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शेतजमिनीतील मनोर्याखाली आत्मदहन करणार असल्याचा इशारा कुंभारी, कर्देहळी, दर्गनहळी, शिरपनहल्लीतील शेतकऱ्यांनी दिला आहे. अशी माहिती सुरत-चेन्नई एक्सप्रेस-हायवे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अड. महारुद्र जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापारेषण कंपनीद्वारे धोत्री ते कुंभारीमार्फत व्होल्टेज एनर्जी प्रा. लि. पुणे यांच्याकडून १३२ के.व्ही.चे अतिउच्च ३४ दाब मनोरे व साधारणपणे ७० शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिनीचे काम पूर्ण होऊन चार महिने झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दि. १ डिसेंबर २०२२ नुसार अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोर्याने व्याप्त जमीन इ वाहिनीच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसानभरपाईपोटी मोबदल्याबाबत सुधारित धोरणाच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करून दिलेले आहे. मात्र पारेषण परवानाधारक कंपनीने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने मनोर्याचे व वाहिनीचे काम पूर्ण केलेले आहे.

======================================================================================================

  • महापारेषण व परवानाधारक यांच्याकडून शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना व नोटीस, पत्रव्यवहार न करता शिवाय शेतात पिक उभे असताना जानेवारी २०२४ मध्ये घाईगडबडीत येऊन शेतकार्यांच्या पिकांचे पंचनामे केल्याचे सांगून, झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अत्यंत त्रोटक स्वरुपाची रक्कम देऊ केलेली आहे. मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात यावी. आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत संबधित यंत्रणेस वारंवार अर्ज व विनंती, पाठपुरावा करूनही कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी शेतजमिनीच्या मनोर्याखाली आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact