एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शीतवाहन घटकासाठी अर्थसहाय योजना
By Kanya News ।।
सोलापूर : जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेतर्गंत काढणीपश्चात व्यवस्थापण घटकांतर्गत शितवाहन या घटकासाठी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
- लाभार्थी निवडीचे निकष :- शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी २५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, तसेच वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान १५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांच्यासाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.
- प्रकल्पाचे तांत्रिक निकष:- शीतवाहनाची कमाल क्षमता ९ मे.टन असावाी ४मे.टन पेक्षा कमी क्षमात असलेल्या शीतवाहनास अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.एमआयडीएच आणि एनसीसीडीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शीतवाहनासाठी ३ क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम १ मे.टन क्षमतेस समतुल्य ग्राह्य धरण्या येईल. लाभार्थीने सदर वाहनाची नोंद आरटीओ कडे ‘गुड्स कॅरीअर’ म्हणून करणे बंधनकार आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस असणे आवश्यक आहे.
- अर्थसहाय्य स्वरूप:-सर्वसाधारण क्षेत्रासाठी साठवण क्षमतेचा विचार करून ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रू.९.१० लाख अर्थसहाय्य देय आहे.