कणबस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळाडू, गुणवंतांचा सत्कार

By Kanya News||
सोलापूर :    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कणबस येथे  मल्लिकार्जुन रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व  गटशिक्षणाधिकारी (दक्षिण सोलापूर) मल्हारी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडू व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात मुलींच्या खो-खो संघाने  शालेय खो-खो स्पर्धेत माध्यमिक विभागात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद विभागात खो -खो मुलींनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. १०० मीटर व २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये शिफा नजीर मुजावर हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीमध्ये भाग्यश्री प्रकाश बनाळे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तसेच दहा विद्यार्थी पात्र झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे  मार्गदर्शक शेखलाल शेख यांनी केले. अनिल थोरात व शिवराज अक्कलकोटे यांनी हा अभिनंदनचा सोहळा आयोजित केला होता. पावसाळ्यामध्ये वाड्या वस्त्यावरून येणाऱ्या मुलांसाठी कै.महादेव थोरात यांच्या स्मरणार्थ १०० छतऱ्या वाटप करण्यात आल्या.

गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांनी खेळ व अभ्यासामध्ये स्वप्न बाळगावेत त्याच्या पूर्णत्वासाठी सतत कष्ट करावेत .खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो असे प्रतिपादन केले. अनिल थोरात व शिवराज अक्कलकोटे यांनी घडून आणलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास अण्णाराव थोरात गुरुजी, मल्लिनाथ चिट्टे, महेश नायकोडे, सागर कदम पोलीस पाटील, शिवानंद पुजारी सर, राहुल कदम, विठ्ठल मुस्के, माजी सरपंच सिद्धाराम थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीशैल नायकोडे, आप्पासाहेब डांगे, मुख्याध्यापक रब्बीलाल मुल्ला, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact