बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने पदाची सेवा पुरविणाऱ्या बेरोजगार सेवा सस्थांना मुदतवाढ
By Kanya News ।।
सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयात सहा महिन्याच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने पदाची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार सेवा संस्थांकडून सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी अकुशल २ शिपाई उपलब्ध करून देण्याकरिता दरपत्रक मागविण्यात आले होते, ते विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे परत दरपत्रक सादर करण्यासाठी बेरोजगार सेवासंस्थाना ७ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णयानुसार दि. ११ डिसेंबर २०१५ मधील अटी व शतींची पूर्तता करणाऱ्या व पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्र सदरची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत कार्यालयास सादर करावे असे आवाहन जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थकोट, सोलापूर-४१३००१ येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक.०२१७-२९९२९५६ द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.