image source
रविवारी पंढरपूर, बार्शी तालुक्यात मेळावे
by kanya news ||
सोलापूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता या विभागांतर्गत असणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शासनाने तालुकास्तरीय मेळावे आयोजित केले आहे. तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग व सर्व समाज घटकातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व सेवाभावी संस्था यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले आहे.
तालुकास्तरीय मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे..
- मंगळवेढा : शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ वेळ : सकाळी १० ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण : रॉयल हॉल सोलापूर रोड, मंगळवेढा.
- पंढरपूर : रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४. वेळ : दुपारी ३ वा. ते सायं. ७ वा. ठिकाण : सदगुरू मंगल कार्यालय, वाखरी पंढरपूर.
- बार्शी : रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४. वेळ : सकाळी ११ वा. ते दुपारी 3 वा. ठिकाण : यशवंतराव चव्हाण सभागृह, नगर पालिकासमोर, बार्शी.
- सांगोला : बुधवार, दि. २८ ऑगस्ट २०२४, वेळ : स.११ वा. ते दु. ३ वा. ठिकाण : पंचायत समिती, बचत भवन, सांगोला.
- करमाळा : शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४. वेळ स. ११ वा. ते दु. ३ वा. ठिकाण : पंचायत समिती सभागृह, करमाळा.
- अक्कलकोट : शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४, वेळ स.११ वा. ते दु. ३वा. ठिकाण: लोकापुरे मंगल कार्यालय, बुधवार पेठ, अक्कलकोट.
- माढा : सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४. वेळ : स.१० वा. ते दु. २ वा. ठिकाण : जगदाळे मंगल कार्यालय, वैराग रोड, माढा.
- मोहोळ : सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४. वेळ दु. १ ते दु. ४ वा. ठिकाण: शुभम मंगल कार्यालय, कोर्टासमोर, मोहोळ.
- माळशिरस : मंगळवार, दि. ३ सप्टेंबर २०२४, वेळ दु. ११ ते दु. ३ वा. , ठिकाण : पंचायत समिती सभागृह, माळशिरस.