१४ वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा
by kanya news ||
सोलापूर : १४ वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ या खेळ प्रकारात इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वानंद तपकिरे याने तिसरा क्रमांक मिळविला.या कामगिरीमुळे त्याची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शहरस्तर बुद्धिबळ स्पर्धा कुमठा नाका, क्रीडा संकुल येथे पार पडल्या. त्यामध्ये तपकिरे यांनी सुरेख कामगिरी केली.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष ए.डी.जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका मानसी जोशी, ममता बसवंती यांनी अभिनंदन केले. त्याला क्रीडा शिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.