एस.आर.चंडक हायस्कूलचा पराभव
By Kanya News||
सोलापूर : शहरस्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या अतितटीच्या अंतिम सामन्यात इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचा संघ विजयी झा;झाला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध एस.आर.चंडक हायस्कूल या दोन्ही संघामध्ये झाला. या अतितटीच्या सामन्यात इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल संघ विजयी ठरला. या स्पर्धा मुळे पॅव्हेलियन हॉल (पार्क चौक) येथे पार पडल्या.
मुलीच्या संघात अनत आशिफ शेख, अभिज्ञा वृंदर काब्रा, तनिषा सुनील हंद्राळमठ, अवनी विजय कबाडे, शोमित्री असित चिडगुपकर या खेळाडूंचा समावेश होता. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला
प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका मानसी जोशी यांनी अभिनंदन केले. या संघास क्रीडा शिक्षक प्रशिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.