दप्तराविना शाळा स्तुत्य उपक्रम : हसापूर जिल्हा परिषद शाळेत रंगला विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा आषाढी वारी दिंडी सोहळा
By Kanya News


सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील हसपुरातील जिल्हा परिषद शाळेत (झेडपी शाळा) विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा आषाढी वारी दिंडी सोहळ्याने सर्वाचे लक्ष्य वेधून घेतले.शनिवार दि.१३ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, हसापूर येथे दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत भारतीय सण- परंपरा माहिती व्हावी याकरीता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल दर्शन वारकरी दिंडी चे आयोजन करण्यात आले.यावेळी निसर्गाचा बिघडत असलेला समतोल साधण्यासाठी वृक्षारोपणाचा संदेश, विद्यार्थी गुणवत्ता उत्तम साधण्यासाठी विद्यार्थी नियमित उपस्थिती-पालकांचा शैक्षणिक सहभाग वाढविण्याचे आवाहन, रोगराई मुक्तीसाठी स्वच्छतेचे संदेश देणारी दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातून विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून रिंगण, फुगडीने श्री च्या जयघोषाने आषाढी वारीची रंगत अवतरली. या निमित्ताने सामाजिक ऐक्याचा संदेश देणार्या दिंडीचे आयोजन शालेय प्रशासनाकडून करण्यात आले.
आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, सदस्याचाही सहभाग
या दिंडी सोहळ्यात आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, सदस्याचाही सहभागगावातील जय हनुमान तरुण मंडळ, भजनी मंडळ गावचे आजी माजी सरपंच, पोलिस पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक, शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. यासाठी मधुकर माळी, गजानन मिराशे, शिवानंद हुल्ले, सौदागर कांबळे व अंगणवाडी ताई रेखा सोनकवडे, ज्योती आहेरकर यांचे सहकार्य लाभले.