गुरव समाजातील आदर्श संस्था, विद्यार्थी, समाजसेवक यांच्यासह ७५ गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा
राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूरचा स्तुत्य उपक्रम

By kanya news ।।
सोलापूर : राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्यातील गुरव समाजातील आदर्श संस्था, आदर्श विद्यार्थी, आदर्श समाजसेवक यांच्यासह ७५ पाल्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रतिवर्षाप्रमाणे चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील इयत्ता दहावी , बारावी व इतर पदवी प्राप्त व समाजातील आदर्श व उत्कृष्ट समाज उपयोगी संस्था, आदर्श विद्यार्थी, आदर्श समाजसेवक यांची निवड करून ७५ गुणवंत, पाल्यांचा सत्कार सोहळा रविवार, दि.२८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत सुरभी हॉल, ओम गर्जना चौक, सैफुलजवळ, जुळे सोलापूर (सोलापूर) याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. सदर गुणवंताचा सत्कार शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय गुरव महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा शिवसेना प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीने हा कार्यक्रम होणार आहे.


सदर पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय गुरव महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लिकार्जून गुरव, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशीकांत जिड्डीमनी, राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य काशीनाथ मेलगेरी, चंद्रकांत गुरव, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत ढेपे, जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे, उपाध्यक्ष महादेव चिंचोळे, जिल्हा सचिव गंगाधर पुजारी, सहसचिव शिवानंद बिराजदार, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, गौरव समीती अध्यक्ष शिवशंकर विजापुरे, उपाध्यक्ष नवनाथ गुरव, सचिव चिन्नय्या स्वामी, सहसचिव मल्लिनाथ बनपुरे, संघटक शंकर पाटील, प्रसिध्दी प्रमुख प्रसन्न स्वामी, दत्तात्रय पाटील, सदस्य राजकुमार पुजारी उपस्थित होते.

समाजातील तळागळाटील हुशार व होतकरू व नवीन पिडी आदर्शवत घडण्यासाठी समाजाच्यावतीने त्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रतिवर्षी महासंघाकडून हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. याही वर्षी इयत्ता १० वी, १२ वी व इतर पदवी प्राप्त केलेल्या तसेच समाजातील आदर्श संस्था, आदर्श विद्यार्थी, आदर्श समाजसेवक   यांची निवड करून ७५ पाल्यांचा सत्कार सोहळा व राष्ट्रीय गुरव महासंघाच्या वतीने दानसुर व्यक्‍तीच्या दिलेल्या देणगीच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात १ ते ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्‍कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. गुणवंताचा शाल, सन्मानचिन्ह, मेडल, बुके व सर्टिफिकेट देवून यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact