भारताच्या ऑलिम्पिक पंढरीत महाराष्ट्रातून एकमेव स्पर्धक सहभागी

By Kanya News||

सोलापूर :   हरियाणा राज्यातील गुरगावमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथॉन स्पर्धेत सोलापूरचे प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनी अवघ्या तीन तास 30 मिनिटात ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करीत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत दीड किलोमीटर स्विमिंग, ४० किलोमीटर सायकलींग आणि दहा किलोमीटर रनिंग या तीन्ही स्पर्धा अवघ्या तीन तास तीन मिनिटात डॉ. अभिजित वाघचवरे यांनी पूर्ण करीत पहिल्या १० मध्ये येण्याचा मान मिळवला.

रविवार, दि. ४ ऑगस्ट रोजी भारताची ऑलिम्पिक मेडल्स पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हरियाणा राज्यातील गुरगावमध्ये ही स्पर्धा एचआर-२६ या नावाने आयेाजित करण्यात आलेली होती. ऑलिम्पिकच्या धर्तीवर स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातील १०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये सोलापूरचे सुपुत्र अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे हे महाराष्ट्रातून एकमेव या स्पर्धेत यश संपादन करणारे स्पर्धक ठरले. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक  २०२४ मध्ये ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथॉन स्पर्धेत जे मापदंड लावले जातात, त्याचनुसार ही स्पर्धा घेण्यात येते. डॉ. अभिजित वाघचवरे हे नेहमी आपल्या स्पर्धेसाठी सराव कायम करीत असतात.  इतर स्पर्धकांनाही सायकलींग, स्विमिंग आणि रनिंगसाठी प्रोत्साहन देवून मार्गदर्शन करीत असतात.
===========================================

सरावातील सातत्य महत्वाचे :  डॉ. वाघचवरे
अशा स्पर्धामध्ये यश मिळवण्यासाठी सरावामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. माझ्या यशात पिताश्री सत्यवान वाघचवरे, मातोश्री शीला वाघचवरे यांचा नेहमीच  पाठिंबा असतो.  डब्लू एस स्पोटर्स आणि इकोचे डॉ. सत्यजित वाघचवरे (अल्ट्रा मॅरेथॉन रनर) हे नेहमी सोबत असतात, तर मॅरेथॉन रनर डॉ. राजश्री वाघचवरे आणि डॉ. शुभांगी वाघचवरे या माझ्या आहारावर विशेष लक्ष देतात. त्यामुळे आगामी काळातील स्पर्धांसाठी मी नेहमी सज्ज राहीन, असेही डॉ. अभिजित वाघचवरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact