गहिनीनाथ महाराज औसेकर यांना सैनिक मित्र पुरस्काराने सन्मानित करणार
By Kanya News ।।
सोलापूर : भारतीय माजी सैनिक संघटनेच्यावतीने पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सह अध्यक्ष ह. भ. प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना यंदाचा “सैनिक मित्र पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सालाबादप्रमाणे यंदाही भारतीय माजी सैनिक संघटनेच्यावतीने “सैनिक मित्र पुरस्कार ” सन्मान सोहळा दि. ३१ जुलै २०२४ रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रसंत शरण बसवलिंग शिवयोगी महास्वामीजी (शिवयोग आश्रम, हरिहर), श्रीकंठ शिवाचार्य महासामीजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच ड्रीम फौंडेशन, डॉ. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळादेखील होणार आहे. असे काशिनाथ भतगुणकी यांनी सांगितले. संस्कार क्रांती ज्ञान सत्रात डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी दत्तात्रय कोहिनकर, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी कार्यक्रमास उपस्तित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्येक्ष श्री अरुण कुमार तळीखेडे यांनी केले आहे.