माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे परिवारांच्या हस्ते होणार नागरी सत्कार
जगाच्या पोशिंद्याचा आणि भजन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान होणार

By Kanya News ।।
सोलापूर : सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त माजी केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिदे, मातोश्री उज्वलाताई शिंदे व खासदार प्रणितीताई शिंदे परिवारांच्या हस्ते दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जामगुंडी मंगल कार्यालय येथे नागरी सत्कार होणार आहे. यावेळी जगाच्या पोशिंद्यांचा अर्थात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, आदर्श निर्माण करणार्‍या १३ बळीराजांचा आणि भजन स्पर्धेत विजेते ठरलेल्या मंडळांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती माजी आमदार दिलीपराव माने गौरव समितीच्यावतीने सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


सहकार, कृषी, पणन, बँकींग, साखर, उद्योग, क्रीडा, कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ध्येयाने काम करणारे माजी आमदार दिलीपराव माने यांचा दि. ३ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून, गौरव समितीच्यावतीने सकाळी १० वा. जामगुंडी मंगल कार्यालयात त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन केलेले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, उज्वलाताई शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे या शिंदे परिवारांच्या हस्ते हा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे. या समारंभास सिध्देश्वर साखर कारखान्याचे धर्मराज काडादी, माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, शिवशरण पाटील, ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार तसेच जिल्हातील, शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

  • माजी आमदार दिलीपराव माने यांच्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी कृषी क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत नाविण्यपुर्ण प्रगतशील शेती करणाऱ्या १३ शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये मल्लिकार्जुन हालप्पा बिराजदार-पाटील (निंबर्गी), नबीसाहेब बारुदवाले (भंडारकवठे), आप्पाराव मुंजप्पा कोले (कंदलगांव), मल्लिकार्जुन म्हमाणे (हिपळे), दयानंद हल्ले (आहेरवाडी), निंबण्णा जंगलगी (भंडारकवठे), मळसिध्द शेंडगे (मंद्रुप), काशिनाथ राठोड (फताटेवाडी), अंबण्णा पंडीत कांबळे (येळेगांव), केदार दिंडोरे (होटगी) मल्लण्णा म्हेत्रे (टाकळी), रामचंद्र बाळकृष्ण ढेपे (पाकणी), शिवाजी लक्ष्मण पाटील (तेलगांव) यांचा सन्मान जगाच्या पोशिद्याचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे.

माजी आमदार दिलीपराव माने यांच्या सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचा गौरव व त्यांच्या पुढील वाटचालीस बळ, शुभेच्छा देण्यासाठी नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. जामगुंडी मंगल कार्यालय, आसरा, जुळे सोलापूर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभास सोलापूर जिल्हा-शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस सचिन चौधरी, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, श्रीकांत . मेलगे-पाटील, युवराज चव्हाण, सुनिल जाधव, उमेश भगत आदी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये दोन दिवस घेण्यात झालेल्या भजन स्पर्धेतील विजेते मंडळाचा सन्मानदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीचे वतीने विद्यार्थी, महिला, वारकरी सांप्रदाय, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करुन दिली आहे. दि. २० जुले रोजी शहरातील ६४ केंद्रावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत विक्रमी ५३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि. २७ व २८ जुलै रोजी झालेल्या भजन स्पर्धेत ४४ भजनी डळांनी सहभाग घेतला. दि. १० ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धा याशिवाय पाककला, होम मिनिस्टर असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact