माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त  शनिवारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

By Kanya News||

सोलापूर : माजी आमदार  दिलीपरावजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही गौरव समितीच्यावतीने दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७. वा. भंडारी मैदान, जुळे सोलापूर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये १० वर्षे मुले-मुली, १४ वर्षे मुले-मुली, बर्षे मुले-मुली असे एकूण ६ गट करण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक गटनिहाय स्वतंत्र बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार आहे.

दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीच्या वतीने चित्रकला, भजन, पाककला, होम मिनिस्टर स्पर्धा, वेगवेगळी तज्ञ मंडळींची व्याख्याने, रक्तदान शिबीर असे सामाजिक, विधायक, कला, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम आयोजन केले जाते. दिलीपराव माने यांचे क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष असून, दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन, कबड्डी, तलवारबाजी, चॅकबॉल अशा स्पर्धेचे नेहमी आयोजन करतात.

 

शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी  ७ वाजता भंडारी मैदान, जुळे सोलापूर येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत ५८०० प्रवेशिका आलेल्या आहेत. आणखी २००० प्रवेशिका येतील. सदर स्पर्धा नियोजनबध्द करण्यासाठी १०० रोड स्वयंसेवक, ४०  पंचाची नेमणूक केली आहे.   अॅम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तरी या  मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *