image source
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने; दि. २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ
by kanya news ||
सोलापूर : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपसाठी अर्ज करण्यासाठी दि. २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोयाबीन या पिकांसाठी सदर योजना लक्षांक प्राप्त आहे.
image source
मागील खरीप हंगामातील सोयाबीन पेरणी क्षेत्रानुसर जिल्ह्यातील तालुका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्यांना लक्षांक वितरीत करण्यात आलेला असून, फ़क्त याच तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ही योजना लागू आहे.
या योजनेंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. ३० जुलै २०२४ पासून सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. व महाडीबीटी पोर्टलवर शेतक-यांना अर्ज करण्यासाठी दि. २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कृषी यांत्रीकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. तरी जास्तीत जास्ततरी शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट ऑनलाईन अर्ज करावेत आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे .