“मिशन ब्युटी: सुंदर मी होणारच”: हुतात्मा स्मृती मंदिरात होणार कार्यक्रम
सोलापुरातील स्त्री त्वचा रोग संघटनेच्या महिला डॉक्टर्स मंडळींच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रमाचे आयोजन
By Kanya News ।।
सोलापूर : मिशन ब्युटी सुंदर मी होणारच या उपक्रमांतर्गत सोलापुरातील स्त्री त्वचा रोग संघटनेच्या महिला डॉक्टर्स मंडळींनी एकत्रित येऊन “मिशन ब्युटी सुंदर मी होणारच” हा एक विधायक उपक्रम राबविण्याचा निर्धार संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ ते दरम्यान सोलापुरातील महिलांसाठी “मिशन ब्युटी: सुंदर मी होणारच” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती त्वचा रोग तज्ञ डॉ. स्मिता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
” मिशन ब्युटी सुंदर मी होणारच” हा उपक्रम सोलापुरातील महिला डॉक्टर्स मंडळींनी एकत्रित येऊन एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये त्वचा रोग तज्ञ डॉ. स्मिता चाकोते, डॉ. तृप्ती खटावकर, डॉ.वैशाली म्हसवडेकर, डॉ. कांचन उकरंडे, डॉ.राजश्री वाघचवरे, डॉ.मिताली मोरे, डॉ.मानसी बोल्ली, डॉ.श्रुती स्वामी-मठ यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी न्यायदंडाधिकारी मनिषा कुंभार, इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि कुष्ठरोगतज्ज्ञ (IADVL) अध्यक्ष डॉ. सचिन कोरे, डॉ. नरेंद्र पटवर्धन, डॉ. गिरीश काळे, डॉ. स्वप्नील शहा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आरोग्यदायी त्वचा! आरोग्यदायी केस!! उत्तम व्यक्तिमत्व!!!
या उपक्रमांतर्गत दि. २१ जुलै रोजी स्त्री त्वचा रोग संघटनेच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये ७० महिलांनी सहभाग घेतला होता. ५० वर्षांपुढील १४ महिलांचा समावेश होता. दरम्यान, त्वचा रोग तज्ञ डॉ. स्मिता चाकोते गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून दर सोमवारी एक कार्यक्रम घेत होत्या. त्वचेचे सौन्दर्य कसे खुलवावे याबद्दल माहिती देत होत्या. आकाशवाणी केंद्रावर पाच लाईव्ह फोन इन प्रोग्रॅममध्ये पाच प्रश्न विचारले जायचे. अचूक प्रश्नांना उत्तर दिलेल्या व्यक्तीस बक्षिसे दिली जायची. तसाच उपक्रम प्रश्न तुमच्या सौन्दर्याचे, उत्तर त्वचा रोज तज्ज्ञाचे या लाईव्ह सेशनमध्ये प्रेक्षकांना प्रश्न विचारायची आहेत. त्यांच्या प्रश्नाला सोलापुरातील स्त्री त्वचा रोग संघटनेच्या तज्ज्ञ महिला डॉक्टर्स मंडळी देणार आहेत. स्रियांच्या उत्तम स्पर्धेमधील उत्तराला प्रिन्सेस, सिल्व्हर, गोल्डन सुंदर त्वचा, उत्तम व्यक्तिमत्व यासाठी २७ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इतिहासातच सोलापुरात प्रथमच असा कार्यक्रम होत असल्याचे सांगितले. सौन्दर्याचे पाच पिलर असल्याचे डॉ. स्मिता चाकोते यांनी सांगितले.
- सौन्दर्याचे पाच पिलर :
त्वचेची काळजी (skin care )
आरोग्याची काळजी (health care )
मन-हृदयाची काळजी (heart care )
बुद्धिमत्तेची काळजी (mind care )
आत्याची काळजी (soul care )