१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४  सामंजस्य करार!

रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार

कन्या न्यूज नेटवर्क ||

दावोस :  दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून,  पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते ३.०५.००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून, यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या २ दिवसांत जे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे करार केले आहेत.  एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५.२०० कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट :

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

  • 21) सिएट
  • क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
  • गुंतवणूक : ५०० कोटी
  • रोजगार : ५००
  • कोणत्या भागात : नागपूर
  • 22) व्हीआयटी सेमिकॉन्स
  • क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
  • गुंतवणूक : २४,४३७ कोटी
  • रोजगार : ३३,६००
  • कोणत्या भागात : रत्नागिरी
  • 23)टाटा समूह
  • क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
  • गुंतवणूक : ३०,००० कोटी
  • 24) रुरल एन्हान्सर्स
  • क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
  • गुंतवणूक : १०.००० कोटी
  • 25) पॉवरिन ऊर्जा
  • क्षेत्र : हरित ऊर्जा
  • गुंतवणूक: १५,२९९ कोटी
  • रोजगार : ४०००
  • 26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
  • क्षेत्र : हरित ऊर्जा
  • गुंतवणूक : १५,००० कोटी
  • रोजगार : १०००
  • 27) युनायटेड फॉस्परस लि.
  • क्षेत्र : हरित ऊर्जा
  • गुंतवणूक : ६५०० कोटी
  • रोजगार : १३००
  • 28) ईरुलर्निंग सोल्युशन्स
  • क्षेत्र : शिक्षण
  • गुंतवणूक: २०,००० कोटी
  • रोजगार : २०,०००
  • 29) ऑलेक्ट्रा ईव्ही
  • क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
  • गुंतवणूक: ३००० कोटी
  • रोजगार : १०००
  • 30) फ्युएल
  • क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
  • राज्यातील ५००० युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण
  • ————————————————————————————
  • दि. २१ जानेवारीपर्यंत
  • एकूण गुंतवणूक : ६,,२५,४५७ कोटी
  • एकूण रोजगार : १,५३,६३५
  • दि. २२ जानेवारी रोजीचे सामंजस्य करार
  • 31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
  • क्षेत्र: पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट
  • गुंतवणूक: ३,०५,००० कोटी
  • रोजगार : ३,००,०००
  • 32) ग्रिटा एनर्जी
  • क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
  • गुंतवणूक : १०,३१९ कोटी
  • रोजगार : ३२००
  • कोणत्या भागात : चंद्रपूर
  • 33) वर्धान लिथियम
  • क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
  • गुंतवणूक : ४२,५३५ कोटी
  • रोजगार : ५०००
  • कोणत्या भागात : नागपूर
  • 34) इंडोरामा
  • क्षेत्र : वस्त्रोद्योग
  • गुंतवणूक : २१,००० कोटी
  • रोजगार : १०००
  • कोणत्या भागात : रायगड
  • 35) इंडोरामा
  • क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
  • गुंतवणूक: १०,२०० कोटी
  • रोजगार : ३०००
  • कोणत्या भागात : रायगड
  • 36) सॉटेफिन भारत
  • क्षेत्र : पायाभूत सुविधा
  • गुंतवणूक: ८६४१ कोटी
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 37) ब्लॅकस्टोन
  • क्षेत्र : पायाभूत सुविधा
  • गुंतवणूक : ४३,००० कोटी
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 38) सिलॉन बिव्हरेज
  • क्षेत्र : अन्न आणि पेये
  • गुंतवणूक : १०३९ कोटी
  • रोजगार : ४५०
  • कोणत्या भागात : अहिल्यानगर
  • 39) लासर्न अँड टुब्रो लि.
  • क्षेत्र : संरक्षण उत्पादन
  • गुंतवणूक : २५०००१०,००० कोटी
  • रोजगार : २५००
  • कोणत्या भागात : तळेगाव
  • 40) नेल्सन मिडिया प्रा. लि.
  • क्षेत्र : आयटी
  • गुंतवणूक: ५० कोटी
  • रोजगार : ११००
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
  • क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
  • गुंतवणूक : १२,७८० कोटी
  • रोजगार : २३२५
  • कोणत्या भागात : नागपूर
  • 42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact